Breaking News

आत्महत्येची धग…कॉलेज तरुणाने घेतला गळफास


– एकुलत्या एका मुलाच्या इहलोकाचे रहस्य गडद
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील पिसगाव येथील अवघ्या सतरा वर्षीय कॉलेज तरुणाने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजता उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कुंदन बबन आत्राम (17) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

तालूक्यातील पिसगाव येथील आत्राम दाम्पत्य हे रोजमजुरी करून जीवन कंठीत होते. त्यांना एकुलता एक मुलगा कुंदन हा मारेगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.

आज शुक्रवार रोजी सायंकाळी आईवडील शेतातून घरी येताच घरात अघटीत दिसल्याने एकच हंबरडा फोडला. मात्र, आत्महत्येचे कारण तूर्तास गुलदस्त्यात असतांना कुंदनच्या अकाली मृत्यूने गावात पुरती शोककळा पसरली आहे.

कुंदनच्या टोकाच्या निर्णयाने आईवडिलांचा आधारवडाने मृत्यूला कवटाळल्याने आईवडील वेगवेगळ्या चिंतेने शून्यात बघत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment