– कायदा व विकसित भारत बाबत विस्तृत माहिती केली विषद
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
पेसा दिनाच्या शुभ पर्वावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले,सभेत पेसा कायद्याची जनजागृती व अंमलबजावणीचे दृष्टीने पेसा समन्वयक श्री सागर कुकुडकर व प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते श्री विपीन गावंडे आदिलाबाद,आणि इतर मान्यवरांनी पेसा कायद्याबाबत माहिती दिली. तसेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन ग्रामीण V.B.- G RAM G. अधिनियम 2025 या विषयावर सविस्तर चर्चा होऊन शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. जनजागृती होण्याचे दृष्टीने व शासन निर्णयानुसार विकास कामाचे नियोजन करण्याबाबत ठराव घेण्यात आला.
पेसा दिनानिमित्य कुमारी भारती नागोराव टेकाम यांनी पेसा कायद्याचे गोंडी भाषेत वाचन केले तर सौ. सीमा संजय येरमे यांनी गोंडी गीत सादर केले,अनुसूचित जमाती घटकातील समाजासाठी व गावांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पदाधिकारी व गावपातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला,तसेच शालेय गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.विशेष ग्रामसभा व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती नंदा रवि मेश्राम प्रमुख पाहुणे उपसरपंच श्री सूरज बुटे, ग्रा. प.सदस्य श्री सदाशिव मेश्राम,सौ. मायाताई रस्से,सौ.सरिता नागोसे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. दिपीका रस्से,सौ. शारदाताई पेंदोर उपस्थित होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सागर कुकुडकर श्री विपीन गावंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता अंगणवाडी सेविका पिसगाव व पांढरकवडा कुमारी अनुसया थेंरे,सौ. सिमा आत्राम ग्रा. प.कर्मचारी मनोज आत्राम,अंजनाताई उईके रोजगार सेवक रवि आत्राम यांनी मोलाचे सहकार्य केले,कार्यक्रमाला पिसगाव व पांढरकवडा येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याध्यापक श्री विजय घोडमारे,प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रभाकर फुलभोगे तर आभार प्रदर्शन श्री रवि आत्राम यांनी केले.