Breaking News

मारोती गौरकार यांना ‘ईश्वर’ चिट्ठीने तारले

 

– बँक प्रतिनिधी म्हणून निवड : सर्वत्र अभिनंदन 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव खरेदी विक्री आमसभेत ईश्वर चिट्ठीने मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मारोती गौरकार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड झाली. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

आज मंगळवार ला नियोजित खरेदी विक्रीची आमसभा आयोजित करण्यात आली होती. यात बँक प्रतिनिधी म्हणून निवड करणे हा विषय प्रामुख्याने चर्चेत घेण्यात आला मात्र कोरम अभावी ही सभा तहकुब करून समोरच्या विहित वेळेत घेण्यात आली.

 

सदर बँक प्रतिनिधी म्हणून तब्बल सात जनांचे नावे समोर आली.त्यामुळे ईश्वर चिट्ठीचा पर्यायाचा अंमल करून ईश्वर चिट्ठीने मारोती गौरकार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड झाली. या निवडीने गौरकार हे सर्वत्र अभिनंदनास पात्र ठरत आहे. यावेळी ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, वसंत जिनिंग चे संचालक अंकुश माफूर,संचालक यादवराव काळे,विलास वासाडे,गौरव आसेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment