Breaking News

राजु उंबरकर चषक… सराटी येथे प्रीमियर लीग क्रिकेट सामने

 

आकर्षक बक्षीसांची खैरात 

 मारेगाव :विटा न्युज नेटवर्क 

ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात वाव मिळावा या उदात्त हेतूने मारेगाव तालुक्यातील सराटी येथे राजु उंबरकर चषक समर्थीत प्रीमिअम लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन 25 डिसेंबर पासून करण्यात आले आहे.

 

जाणता राजा क्रिकेट क्लब सराटी द्वारा आयोजित प्रीमिअम लीग सामन्यात प्रथम बक्षीस 40,000, दुसरे 20,000, तिसरे 15000 व चौथे 10 हजार रोख रकमेत आहे. या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज / फलंदाज, हॅट्रिक षटकार व हॅट्रिक विकेट्स घेणाऱ्यास बक्षीस देण्यात येणार आहे.

 

सदरील सामन्यात परिसरातील स्पर्धक संघांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment