Breaking News

पर्वणी.. उद्या मारेगावकर अनुभवणार “भारूड”

 

– जीवन मूल्य सांगणारे अनोखे प्रबोधन

– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून उद्या दि. 22 नोव्हेंबर शनिवार रोजी नगरपंचायत प्रांगणात भारूडफेम गोविंद महाराज गायकवाड हे आपल्या हसमुख वाणी व प्रगल्भ विनोदातून सामाजिक प्रबोधनाने मारेगावकरांना भुरळ घालणार आहे.

 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ह. भ. प. श्री. गोविंद महाराज गायकवाड हे मारेगाव नगरीत प्रथमच येत आहे. “भारूड” हा पारंपारिक लोककलेचा प्रकार असून याद्वारे समाजप्रबोधन व जनजागृती केली जाते.

ज्येष्ठ नेते नरेंद्र पा. ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मारेगावकरांना गोविंद महाराज यांच्या मधुर आणि विनोदी वाणीतून सामाजिक उपदेशाचा डोस पर्वणी म्हणून मिळणार आहे.

 

तालुक्यातील तमाम रसिक श्रोत्यांनी सदर कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन नरेंद्र ठाकरे मित्र परिवार कडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment