Breaking News

कोसारा अपडेट.. जखमी कोतवाल यांची पोलिसात तक्रार

 

विविध कलमान्वये गुन्हे दाखल 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

कोसारा रेती घाटात कोतवाल व पोलीस पाटील यांचेवर ट्रॅक्टर चढवून जखमी केलेल्या कोतवाल यांनी मारेगाव पोलिसात फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, मुख्य आरोपी अद्यापही पसार असून मारेगाव पोलीस पथक कसून शोध घेत आहे.

 

सोमवारी मध्यरात्री कोसारा रेती घाटावर अवैध वाळू ची तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर असल्याची माहिती तलाठी प्रवीण उपाध्ये यांनी कोतवाल दिलीप पचारे व पोलीस पाटील प्रेमदास गाणार यांना देताच घटनास्थळाकडे निघाले. मागावून तलाठी पथक रवाना झाले.मात्र, पाच ट्रॅक्टर पैकी एका ट्रॅक्टर चालकाने दुचाकीवर स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर चढविले यात पोलीस पाटील व कोतवाल गंभीररित्या जखमी झाले.

या घटनेने प्रशासन पुरते हादरले असून तस्करांचे मनसुबे हाणून पाडण्याचे तगडे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. दरम्यान, या घटनेची फिर्याद कोतवाल पचारे यांनी पोलिसात दाखल केली असून त्यानुसार संशायित आरोपीवर कलम 109,132, 221, 324 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ट्रॅक्टर सह व आरोपी अजूनही पसार असल्याने पोलीस पथक त्यांच्या चहुबाजूने मागावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment