कुंभा गणात जयवंत ठेपालेंना उमेदवारी मिळाल्यास विजयश्री निश्चित!”

 

– कार्यकर्त्यांची एकमुखी भूमिका भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच 

विटा न्युज नेटवर्क – विशेष वार्ताहर

मारेगाव: बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. हौसे-गवसे नवखेही मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना भारतीय जनता पक्षात मात्र अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्ते जयवंत ठेपालेंना कुंभा गणातून उमेदवारी मिळावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

मागील पंचायत समिती निवडणुकीत जयवंत ठेपाले यांनी जोरदार लढत देत प्रतिस्पर्ध्याला घाम फोडला होता. ऐनवेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सभा रद्द झाल्याने त्यांना थोडासा फटका बसला आणि ते तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तरीही ठेपालेंची लोकप्रियता आणि जनाधार कायम राहिला.

यावेळी मात्र भाजप कार्यकर्त्यांनी ठेपालेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत “उमेदवारी जयवंत ठेपालेंनाच मिळावी” अशी मागणी पुढे केली आहे. पक्षांतर्गत नवख्या उमेदवारांना तिकीट मिळाल्यास तो पक्षासाठी तोट्याचा ठरेल, अशी भावना कार्यकर्त्यांत आणि सामान्य नागरिकांत दिसत आहे. त्यामुळे कुंभा गणातील मतदारांचे लक्ष आता भाजप कोणाला तिकीट देते याकडे खिळले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment