Breaking News

खेडा खरेदी…तर व्यापाऱ्यांना घेराव घालू…!

 

– मारेगाव तालुका राष्ट्रवादी पार्टीचा ईशारा 

– शेतकऱ्यांची वारेमाप लूट : प्रशासन मूग गिळून 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

खरेदीचा परवाना नसतांना अवैध व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागात जाळे विणले.शहरासह ग्रामीण भागात खेडा खरेदी सुरु केली.यात व्यापारी मर्जीनुसार दर देत आहे.दररोज शेकडो क्विंटल कापूस अवैधरित्या खरेदी करण्यात येत असतांना प्रशासन मात्र मूग गिळून आहे.विशेष म्हणजे खेडा खरेदीसाठी वापरले जाणारे वजनमापही संशयास्पद ठरत असतांना शेतकऱ्यांची फसवणूक आता पुरे झाले. हा गोरखधंदा तात्काळ बंद करा अन्यथा मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण भागात जावून व्यापाऱ्यांना घेराव घालेल व प्रशासनाच्या ताब्यात देईल असा गर्भीत ईशारा देण्यात आला.

मारेगाव तालुक्यात ढगाळ वातावरण व पावसाच्या हजेरीने तूर्तास कापूस खरेदी केंद्र सुरु नाही याचाच फायदा घेत अवैध कापूस खरेदीला तालुक्यात जोर चढला आहे.आजतागायत शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल कापूस अत्यल्प दराने व्यापाऱ्यांच्या घशात गेला आहे.

 

विशेष म्हणजे परवाना नसतांना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट चालविली आहे.ग्रामीण भागात तर खुलेआम लुटले जात आहे.कृषी प्रधान देशाचा पोशिंदा खुलेआम लुटल्या जात असतांना प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत मूग गिळून आहे.आपल्या मर्जीने दर देणाऱ्या व्यापाऱ्यांकडे कोणताच परवाना नसतांना खेडा खरेदीने ग्रामीण भागात जोरकसपने धूम माजविली आहे.

 

शेतकऱ्यांना लुटतांना वजनमापही संशयास्पद आहे.मोठ्या परिश्रमाने पिकविलेला कापूस कवडीमोल दराने व्यापारी घशात घालत असतांना प्रशासन मात्र चुप्पी साधून आहे.यात प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांची लूट थांबाविण्यासाठी आता मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे सरसावत ग्रामीण भागात अवैध व्यापाऱ्यांना घेराव घालून मुसक्या आवळत प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.अवघ्या दिवसात होणाऱ्या या घेराव आंदोलनाकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.याबाबतचे निवेदन वरिष्ठाना देण्यात आले असून निवेदनावर तालुका अध्यक्ष दयाल रोगे, जिल्हा सरचिटणीस शाहरुख शेख, युवा तालुका अध्यक्ष समीर कुळमेथे, शहर अध्यक्ष पियुष ठेंगणे, उपाध्यक्ष मयूर मसराम यांचेसह बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment