Breaking News

मैत्रीबंध.. तीन दशकाच्या आठवणीत रमले माजी विद्यार्थी

 

– मारेगाव आदर्श हायस्कुल मध्ये स्नेहमिलन सोहळा  

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

1995-96 चे शैक्षणिक सत्र.खाकी हाफ पॅन्ट अन पांढरं शर्ट.कुणाचं नायलंनचं तर कुणाचं कापडी दप्तर.शाळेतील कडक शिस्त. तेवढीच मस्ती. एकत्रित केलेला अभ्यास. शिक्षकांचा वचक. क्रीडा स्पर्धा. गुरुजींनी दिलेली छडी आणि शिक्षा.. अशा विविधांगी माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

प्रसंग होता मारेगाव येथील आदर्श हायस्कुल येथील 1995 – 96 या शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा. शैक्षणिक क्षेत्रातील तरुणपण त्यानंतर विखूरलेले मित्र तब्बल 30 वर्षानंतरच्या सर्वांगीण बदल घडलेल्या विद्यार्थ्यांची गत रविवारला स्नेह भेटीत सर्वच रमले.

तब्बल 30 वर्षानंतर सोशल मिडियावरून एकत्रित आलेल्या मित्रांचा स्नेहमीलन सोहळ्याचा प्रारंभ राष्ट्रगीताने होवून शाळा भरविली व तीन दशके मागे जात शालेय आठवणीला उजाळा दिला.यावेळी सामाजिक दायित्व स्वीकारून वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षणाचे धडे देणाऱ्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांना पाचारण करीत त्यांचा शाल श्रीफळ देत गौरव करण्यात आला.माणुसपण घडविणाऱ्या शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांत रमत जुन्या शब्दांकित आठवणीने तीन दशके मागे नेत उजाळा दिला.

दरम्यान, स्नेहमीलन सोहळ्यात कैलास दुधकोहळे,सुरज महाजन, सुधीर ढेंगळे,सचिन खडसे,हर्षल चिंचोलकर,बालू काकडे, कांचन ठाकरे, रंजना सारवे, अर्चना बिडकर, विद्या धोपटे, उज्वला काकडे,सचिन कोणप्रतीवार,माया भागवत, सुलभा आस्वले,वैशाली वटे, मंजुषा बदकी,वैशाली मस्की, संगीता ठेंगणे,सिराज शेख, अशपाक शेख, गणेश निवल, राजु कुमरे,गणेश बदखल, प्रवीण सावरकर, भाग्यवान तेलंग, हेमंत गजभिये,मोहन घोटेकार, प्रशांत आवारी यांचेसह बहुतांश पूर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गाढवे यांनी केले तर इकबाल सय्यद यांनी आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment