– वणी तालुक्यातील नांदेपेरा येथून मारेगाव तालुक्यात खेप
मारेगाव : संतोष रोगे
तालुक्यात अवैध व्यवसायाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतांना भरीसभर म्हणून आता चक्क देवस्थान समोरच देशी विदेशी अवैध विक्री जोमात सुरु असल्याचे वास्तव समोर आल्याने भाविकात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वनोजादेवी येथे जनामाय कासामाय देवस्थान लाखो भक्ताचे श्रद्धांस्थान असून दूरवरील भक्त स्वयंपाक सह भक्तीसागरात तल्लीन असते. जागृत देवस्थान म्हणून अख्यायिका असलेल्या देवस्थान समोरच देशी विदेशी दारूची सर्रास विक्री जोमात सुरु आहे. या विक्रीने युवकात व्यसनाधीन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून धार्मिक तेढ निर्माण होण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, वणी तालुक्यातील नांदेपेरा येथून दारू ची सप्लाय थेट मारेगाव तालुक्यात होत आहे. मारेगाव तालुक्यातील बहुतांश ग्राम खेड्यात सप्लाय करुण अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे.
या व्यवसायाने अनेकांचे कुटुंब उध्वस्त होवून युवकात व्यसनाधीनचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यामुळे आत्महत्येचा रेशो वाढण्याला अवैध व्यवसायाची किनार असल्याचे बोलले जात आहे.
या व्यवसायात राजकीय पदाधिकारी अग्रेसर असून त्यांचेवर पायबंद घालावा अशी मागणी जोर धरत आहे.