दुचाकीला धडक सेवानिवृत्त शिक्षक ठार

 

मारेगाव येथील घटना 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

घरी दुचाकीने जात असतांना मागावून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जबर धडक दिल्याने समोरील दुचाकीस्वार खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारला दुपारी 2 वाजताचे सुमारास वणी मारेगाव रोडवरील राष्ट्रीयकृत बँकेच्या समोर घडली.

 

मुकुंदराव पत्रुजी राजूरकर (61) असे अपघातात ठार झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.

 

राजूरकर हे मारेगाव जि. प. शाळेतून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. मारेगाव येथे वास्तव्य असतांना आज ते दुचाकीने बँकेतून घरी जात असतांना ही दुर्देवी घटना घडली.दरम्यान, अपघात होताच त्यांना वणी येथे नेत असतांना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालविली. मृतक मुकुंदराव राजूरकर यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन मुली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

1 thought on “दुचाकीला धडक सेवानिवृत्त शिक्षक ठार”

  1. राजुरकर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते , शिक्षक म्हणून त्यांनी मनातून सेवा केली , वेळेला ते खूप महत्व देत , कधीही प्रार्थना मिस केली. शिक्षकी पेशाला ते बांधिलकी मनात. असा विद्यार्थ्यांचा हित जपणारा शिक्षक आणि माझा योग सवंगडी आज अनंतात विलीन झाला , त्यांची मृत्यूची बातमी मला कळताच खूप दुःख झाला. त्याच्या आत्म्याला ईश्वर चरणी जागा मिळो, हिच माझी प्रार्थना. मी आणि माझ्या कुटुंबीया कडून त्यांना श्रद्धांजली.

Leave a Comment