Breaking News

बुद्धगया महाबोधी विहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करा

 

– वंचित बहुजन आघाडीची जोरदार एन्ट्री 

– तहसीलदारांना निवेदन 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनाचा आणि नियंत्रणाचा वाद बौद्ध संघटना व इतर समाज यांच्यात सुरु आहे. बौद्ध संघटनांनी हे विहार बौद्ध भिक्षुच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. यासाठी देशभर आंदोलनेही केली जात आहे. या मागणीला पाठिंबा म्हणून मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मारेगाव तहसीलवर हजारो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चाचा एल्गार पुकारत प्रशासनाला निवेदन दिले.

मारेगाव बदकी भवन येथून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निरज वाघमारे, वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केले. हजारो महिला पुरुषांची उपस्थिती असलेल्या मोर्च्यात महाविहार बौद्ध भिक्षुच्या ताब्यात द्या.. सनातनी व्यवस्थेतून मुक्तता करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करा, मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आदी मागण्या आणि घोषणा करीत हजारो मोर्चेकरांचा मारेगाव तहसील कार्यालयात मोर्चा धडकला.येथे सरकारच्या तुघलकी धोरणाचा निषेध करीत प्रहार करण्यात आला.यावेळी वणी – मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

दरम्यान, महाबोधी विहार बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थान असलेले महाविहार अन्य धर्मियांच्या ताब्यात का ? सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बांधल्या गेलेले जगभरातील समस्त बौद्धाचे पवित्र श्रद्धास्थान आणि प्रार्थनास्थळ असलेल्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या बोद्धगया येथील महाबोधी विहारास सनातनी व्यवस्थेतून मुक्तता कधी मिळणार? हा प्रश्न कित्येक वर्षांपासून विचारल्या जात आहे.गेल्या अनेक महिन्यापासून विविध अडचणी व अडथळ्यावर मात करून भारत व जगभरातील भिखुंन्नी विहाराच्या आंदोलनाचा लढा उभारला आहे.

दरम्यान, महाबोधी विहार तात्काळ बौद्ध भिक्षुच्या स्वाधीन करा अशी जोरदार मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली.आंदोलन यशस्वीतेसाठी मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment