Breaking News

आंतराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य… मारेगाव येथे शनिवारी सभासद मेळावा

 

रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेचा पुढाकार 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

आंतराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने मारेगाव येथे दि. 27 सप्टेंबर ला स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण सभासद मेळाव्याचे उदघाट्क आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी ना. सह. पत संस्थेचे अध्यक्ष अँड. देविदासजी काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजूदास जाधव हे प्रमुख अतिथी असतील.

 

शनिवारला दुपारी 12.30 वाजता सुरु होणाऱ्या सभासद मेळाव्यास उपविभागातील मान्यवर तथा सभासदांनी प्रामुख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक परिक्षित एकरे, सुधीर दामले, हरीशंकर पांडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, अँड. घनश्याम निखाडे, डॉ. भूपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, पुरुषोत्तम बद्दमवार, उदय रायपुरे, लिंगारेड्डी अड्डेलराव, अरविंद ठाकरे,सुनील देठे, छायाताई ठाकुरवार, निमाताई जिवणे, मुख्य. कार्य. अधिकारी संजय दोरखंडे,शाखा व्यवस्थापक संतोष घुगुल यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment