– शेतकऱ्यांचे संवेदनशील प्रश्न ऐरणीवर : शासन – प्रशासन सुस्त
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्याला विविध समस्यांनी कवेत घेतले असून जनमानसात तीव्र नाराजी असतांना शेतकरी व सर्वासामान्य जनतेच्या प्रलंबित प्रश्नाचे निरसन करण्यासाठी शिवसेना उबाठा ने शासन प्रशासना विरोधात मार्डी येथून एल्गार पुकारत थेट आमरण उपोषण केल्याने सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
मारेगाव तालुका विविध समस्येच्या कात्रीत सापडला आहे.त्यात अस्मानी सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या मागावर असतांना आर्थिक मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, सोयाबीनवर आलेल्या कीड प्रादुर्भावाने उत्पादनात कमालीची घट चे संकेत असतांना 50 हजार रु.एकरी नुकसान भरपाई देण्यात यावी.तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, तालुक्यातील 132 केव्ही सबस्टेशन सुरु करण्यात यावे,तालुक्यातील रस्त्याची झालेली चाळणीने खड्डेमय रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे, तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेना उबाठा चे तालुका अध्यक्ष पुरोषत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, सचिन पचारे,विजय अवताडे, शरद ताजने सह पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण मारेगाव तालुक्यातील मार्डी येथून सोमवार पासून एल्गार पुकारला आहे.
दरम्यान, तालुका विविध समस्येच्या गर्तेत असतांना शेतकऱ्यांसह जनसामान्य लोकांचे संवेदनशील प्रश्नांचे प्रशासन कसे निरसन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.