– दिल्ली येथील परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्थेकडून सन्मान
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
श्री. परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्था, दिल्ली द्वारे दिल्या जाणाऱ्या विविध नामवंत पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली, त्यात मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्री. परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्था, दिल्ली कडून प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांना विद्यार्थी व शिक्षक यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, व्यावसायिकता, संशोधन नवकल्पना आणि महाविद्यालय व्यवस्थापन इत्यादी सेवांची गुणवत्ता आणि योगदान या निकषाच्या आधारे हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. घरडे यांना पुरस्कार जाहीर होताच शेतकरी शिक्षण संस्था, मारेगाव व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मित्रपरिवाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.