– जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची चाचपणी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात वणी विधानसभा आढावा बैठक पार पडली.
शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचाराचा वारसा पुढे नेत अजितदादा पवार यांच्या आदेशाने इंद्रनील नाईक राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे, राज्य सरकारच्या विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावे, विशेषकरून शेतकरी, शेतमजुर , महिला आणि युवकांसाठी असलेल्या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा,पक्षात युवा वर्गाचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम हाती घ्यावे अशा सूचना मा.श्री.वसंतराव भाऊ घुईखेडकर प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा अध्यक्ष महाराष्ट्र हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन यांनी केल्या.
पक्षातील विविध सेल आणि तालुक्याचा आढावा मा.श्री. बाळासाहेब कामारकर पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ यांनी घेतला. यावेळी योगेश धानोरकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी यवतमाळ, प्रमोद शिंदे अध्यक्ष ओबीसी सेल, मिलिंद रामटेके प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, हितेश खालपाडा प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग, ऋषिकेश पंडितकर कार्याध्यक्ष विद्यार्थी सेल, आशिष भाऊ मोहितकर विधानसभा अध्यक्ष वणी, दयाल रोंगे तालुकाध्यक्ष मारेगाव , गणेश आवारी झरी जामनी तालुकाध्यक्ष, शादाब अहमद वणी शहर अध्यक्ष, किशोर काळे युवक शहर अध्यक्ष, रवींद्र ठावरी, शैलेश जुनगरी ,शिराज सिद्दिकी ,समीर पेचे, सचिन वांढरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.