मारेगाव – विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील साखरा गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, गावातील ४२ वर्षीय ऑटोचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आज दुपारी उघडकीस आली.
मृतकाचे नाव बबन जोगीराम परचाके (वय अंदाजे ४२ वर्षे, रा. साखरा) असे आहे.
आज शुक्रवारला सकाळी सुमारे अकरा वाजताच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले होते. सरकारी गावठाण परिसरात लागून असलेल्या पळसाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले.दुपारी सुमारे दोन वाजता, त्यांच्या मुलाने घराच्या बाहेर पाहिले असता, वडील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने तत्काळ धाव घेऊन इतरांना माहिती दिली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मृतक बबन परचाके हे पेशाने ऑटोचालक होते. मात्र त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचा मागे पत्नी,दोन मुले असा आप्त परिवार आहे.घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.