सव्वा लाखाच्या बक्षीसांची खैरात.. कुंभा येथे नृत्य स्पर्धेचे आयोजन

 

नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीचां सत्कार 

– सरपंच अरविंद ठाकरे जन्मदिनाचे औचित्य 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे व काव्या राजु ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून येत्या 20,21,22 डिसेंबर रोजी वयोगटातील एकल व समूह नृत्याचे आयोजन करण्यात आले असून लोकप्रतिनिधीचां गौरव करण्यात येणार आहे.

 

मारेगाव तालुक्यातील सांस्कृतीक वसा जपून ग्रामिण भागातील नृत्य कलावंतांना आपल्या कलांना वाव मिळण्यासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नृत्य स्पर्धा दोन गटात असून अ गटात 14 वर्षाखालील व ब गटात 15 वर्षावरील स्पर्धकांचा समावेश आहे. एकल व समूह नृत्य स्पर्धेत वेगवेगळे बक्षीस ठेवण्यात आले असून प्रोत्साहनपर ट्रॉफी देण्यात येणार आहे.

 

खासदार प्रतिभाताई धानोरकर,खा.संजय देशमुख,आमदार संजय देरकर यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील तमाम स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवून आपली कला प्रदर्शित करावी असे आवाहन आयोजक अरविंद ठाकरे मित्र परिवार यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment