आंदोलनाचा पवित्रा…कब्रस्थानात नळयोजना देण्यास नगरपंचायतचा नकारघंटा

 

– असंतोष शिगेला : सामाजिक कार्यकर्त्याचा उपोषणाचा एल्गार

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

येथील कब्रस्थानात नळयोजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने नकारात्मक भूमिका घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. परिणामी, प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारून उपोषणाचे हत्यार उपसण्याचा गर्भीत ईशारा दिल्याने संवेदनशील बनलेल्या याप्रश्नांकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

मारेगाव येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय आहे. येथील कोलगाव रोड लगत असलेल्या कब्रस्थानात एखाद्याच्या मृत्यू नंतर शेकडो नागरिक अखेरचा निरोप देण्यासाठी येत असतात. मात्र, येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने समूह तथा आप्तेष्ठाची कमालीची गैरसोय होते आहे. किंबहुना येथे प्रशासनाकडून नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून समाजातील घटक हेलपाट्या घालत आहे. नव्हे तर नळयोजना कार्यान्वित करण्यासाठी ठराव ही घेण्यात आला असे नगराध्यक्ष सांगतात.मात्र, नेमके पाणी कुठे मुरत आहे हे न समजण्या पलीकडील कोडे निर्माण झाले आहे.

दरम्यान, येथे ट्यूबवेलचे नियोजन आहे, तूर्तास सामान्य फंडात निधीची उपलब्धता नसल्याने नळयोजना देवू शकणार नाही असे मुख्याधिकारी बाबर यांचे म्हणणे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

एखादा धार्मिक समूह एकत्र होत असल्याने तेथे पाण्याची मूलभूत गरज निर्माण करण्याची गरज ही प्रशासनाची असते मात्र येथे प्रशासनाचे हात वर होत असल्याने नेमका न्याय कुणाला मागावा? यासाठी आता आंदोलनाच्या मार्गाने न्याय मागण्याचे उपोषणाचे हत्यार उपसण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते उमर शरीफ यांनी दिला आहे.प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेने सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment