आवाज शिट्टीचा… विकासाची ब्लू प्रिंट हाताशी असणारे संजय खाडे विधानसभेत देणार मात

 

– दिमतीला नरेंद्र ठाकरे, विश्वास नांदेकर, गौरीशंकर खुराणा यांचेमुळे मारेगाव तालुक्यात बाजू सरस 

मारेगाव : दीपक डोहणे 

 

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराने आता मोठा वेग घेतला आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधून रात्र दिवस एक केले आहे. अशा वेळेस “शिट्टी” हे चिन्ह घेवून या विधानसभेतील अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा व्यापक प्रचार मोहिमेने अनेक उमेदवारांना धडकी भरली आहे. खाडे यांच्या दिमतीला पक्षाची पर्वा नाही करता ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, माजी आमदार विश्वास नांदेकर, बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांची भक्कम बाजू मारेगाव तालुका प्लस करीत या निवडणुकीचे चित्र पालटणार आहे.

संजय खाडे यांनी या विधानसभेत एक लोक चळवळ उभारली आहे. वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र, लोकांकरीता जनहित केंद्र आदी कामामुळे संजय खाडे यांचा या विधानसभेच्या जनतेमध्ये मोठा नेटवर्क पसरला आहे. आणि हा नेटवर्क या विधानसभेच्या निवडणुकीत संजय खाडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.

 

सर्वाना आपलंस करणारा संजय खाडे यांचा स्वभाव तसेच पुढील पाच वर्षात या विधानसभेत विकासाची नविन पहाट उगविण्यासाठी नेमके कोणते कोणते काम करावे लागेल याची एक ब्लू प्रिंटच संजय खाडे यांचेकडे तयार आहे.

आमदारकीचा अनुभव असलेले विश्वासभाऊ नांदेकर, चार दशकाहून अधिक या परिसरातील राजकारणात आपली हयात घालविणारे नरेंद्र ठाकरे, जनहिताच्या माध्यमातून प्रामुख्याने संवेदनशील प्रश्नांना हात घालून भावनासदृश्य मदतीची फुंकर घालणारे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या भरभक्कम साथ संगतीने मतदारांचा कौल संजय खाडे यांच्याकडे अधिक प्रमाणात झुकत आहे. त्यामुळे इतर उमेदवारांच्या छातीत कमालीची धडकी भरली आहे. जनतेच्या मनातलं खऱ्या अर्थाने 20 नोव्हेंबर ला मतपेटीतून 23 दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment