– लोकहिताच्या प्रश्नासाठी राजु उंबरकरच्या तत्वतेची जोरदार चर्चा
– जनआंदोलनाने मागील काळात ऐन दिवाळीत भोगावा लागला होता तुरुंगवास
दीपक डोहणे : मारेगाव
वणी उपविभागातील मनसे फेम राजु उंबरकर व त्यांची टीम यांच्याकडे यांचेकडे काम घेवून गेलेला कोणताही माणूस आजतगायत निराश होवून परत आला नाही. मनसे ची फौज कोणत्याही प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहिली याबद्दल कुणाचेही दुमत नाही. राजु उंबरकरांची कार्यशाली या विधानसभेत त्यांच्यासाठी मोठा प्लस पॉईंट ठरत आहे.
राजु उंबरकर यांचे रुग्णसेवा केंद्र हे बरेच लोकप्रिय आहे. पैशामुळे हतबल झालेला माणूस आजारपणाची समस्या घेवून गेल्यावर राजूभाऊंनी यांनी त्यांच्या मोठ्या शस्रक्रियेसारख्या आरोग्याचा प्रश्न उचलला आहे.या निस्वार्थी सेवेतून अनेकांना जगण्याचे पाठबळ मिळाले आहे.शेती कामासाठी चिखल तुडविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राजुने अनेक पांदन रस्ते बांधून दिलेत. किंबहुना नैसर्गिक संकट असो की सर्पदंशाने पशुधन (बैलजोडी ) मृत्यूमुखी पडली तरी बळीराजाची शेती पडू नये म्हणून चक्क बैलजोडीची व्यवस्था करून देणारा हा राजु मतदारांच्या मनात ” कामाचा माणूस ” म्हणून घट्ट चिकटला आहे.विजेचा लपंडाव या विभागातील आणखी मोठी समस्या. अधिकारी ऐकत नाही. तेव्हा उंबरकर यांनी वीज संकटासाठी मोठे अभिनव आंदोलन केले.
शेतकरी मरत असतांनाही प्रशासनाला जाग येत नाही. हे पाहून राजु उंबरकर अस्वस्थ होतो. जिल्हा कृषी विभागात मोठे आंदोलन केले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र गर्दभासारखे झोपेत होते. उंबरकर या आंदोलनामुळे, प्रशासनाच्या खाबुगिरीमुळे व राजकारण्याच्या कुटील डावामुळे मागील काळात ऐन दिवाळी सारख्या सणात तुरुंगवास भोगावा लागला. मात्र राजु उंबरकर यांनी त्याचीही पर्वा केली नाही.
त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी आपण गंभीर आहोत. असे सोंग करण्यापेक्षा येथील सर्वसामान्य, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी आदींचे प्रश्न घेवून लढणाऱ्या खऱ्या मनसे सैनिकासाठीआता मतदार आता आपला कौल देणार असल्याचे सर्वत्र चित्र बघायला मिळत आहे.