कामाचा माणूस…. झोपणारा नाही तर कामाचा पठ्ठा हवाय

 

राजु उंबरकरांसाठी मतदारांच्या बोलक्या प्रतिक्रिया

मारेगाव : दीपक डोहणे

ऊबदार दुलईमध्ये झोपून जनतेच्या विकासाचे गप्पा मारणारे उमेदवार वणी विधानसभेत आमदार होण्यासाठी आतुर झाले असले तरी मतदार राजा मात्र त्यांच्यापेक्षाही अधिक चतुर झाला आहे. केवळ खोटा विकासाचा गवगवा करून मते मागून घ्यायची. जातीय समीकरण वापरायची. पैसे वाटायचे आणि मग त्याची वसुली करण्यासाठी आमदारकी भोगायची. असा फंडा वापरणाऱ्या राजकारन्यांणा आता वणी विधानसभेत जनता कमालीची वैतागली आहे.

 

या विधानसभेत सामान्यांचे अनेक प्रश्न मोठे गंभीर झाले आहे.हाताला काम नसलेले बेरोजगार व कर्जात पिचलेले शेतकरी या विभागात मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. मात्र, स्थानिकांनी जनतेच्या कोणत्याही प्रश्नाला कधीच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संकटात सापडलेला सर्वसामान्य माणूस आशेने राजु उंबरकर चे दार ठोठावतोय. आणि राजु उंबरकर त्यांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालतो. यामुळे राजु उंबरकर यांनी मदतीचा हात दिला नाही असा एकही गाव नाही. या विधानसभेत प्रत्येक गावात राजु उंबरकर यांनी कार्य केले आहे. त्यातून लोकांचे अनेकदा अवघड व किचकट झालेले प्रश्न सुटले आहे.

त्यामुळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मग झोपा काढतात काय? असा सवाल गावखेड्यातील मतदार करीत आहे. आमचे प्रश्न सोडविणारा माणूसच आता आमदार होणे गरजेचेच नाही तर अनिवार्य आहे.असे लोकं बोलत आहे. यामुळे आता राजु उंबरकर ला यावेळेस विधानसभेत एक संधी देणे आवश्यक आहे.अशी मानसिकता आता मतदारांनी बनविले आहे. विधानसभेचा कौल राजु भाऊ यांचेच भाग्य उजळणार असे सर्वत्र चित्र राजु उंबरकर यांचे पारडे जड करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment