– जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे दिनांक 26 आणि 27 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता काऊन्सिल बेंगलोर च्या कमिटीद्वारे मूल्यांकन करण्यात आले. सदर मूल्यांकनात महाविद्यालयास सायकल दोन मध्ये 4 पैकी 2.9 CGPA मिळाले आणि जिल्यातील सर्वच तालुक्यामध्ये अव्वल स्थान मिळाले आणि बी प्लस प्लस दर्जा प्राप्त झाला. मूल्यांकनात महाविद्यालयाला मागील पाच वर्षांतील अचिवमेंट्स आणि उत्कृष्ठ डॉक्युमेंट्रीला 4 पैकी 3.09 CGPA सहीत A दर्जा प्राप्त झाला. कमिटीद्वारे 2.71 CGPA प्राप्त झाले.
देशातील 56205 हायर एज्युकेशन ईन्स्टिट्यूटस पैकी केवळ 850 ईन्स्टिट्यूटला सदर ग्रेड प्राप्त करता आले. त्यापैकी काही वरच्या स्थानी असलेल्या इन्स्टिट्यूट मध्ये हे महाविद्यालय गौरवास पात्र ठरत आहे.
महाविद्यालयाला मिळालेला हा बहुमान नक्कीच 33 वर्षापासून याच महाविद्यालयात कार्यरत असलेले सन्माननीय प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश घरडे सर यांचे व्हिजन, मेहनत, हार्डवर्क, डिवोशन आणि डेडिकेशन ला जाते. 2014 पासून ॲक्टिव आणि तप्तर पणे महविद्यालयाच्या इंटर्नल क्वालिटी असुरन्स सेल्सचे कॉरडीनेटर डॉ. एन. आर. पवार चे कार्य मूल्यांकनासाठी अतिशय मोलाचे ठरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, इंटर्नल क्वालिटी असुरन्स सेल्सचे कॉरडीनेटर प्रा. डॉ. एन. आर. पवार, इंटर्नल क्वालिटी असुरन्स सेल्सचे सल्लागार प्रा. डॉ.दिनेश गुंडावार आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी बंधू यांनी मुल्यांकनासाठी अथक परिश्रम घेतले .
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जीवन पाटील कापसे, उपाध्यक्ष मा. श्री. नानाजी पाटील खंडाळकर, सचिव मा. श्री. सुधीरभाऊ दामले, सहसचिव ॲड. मा. श्री.भास्करराव ढवस, ज्येष्ठ सभासद आणि मार्गदर्शक मा. श्री. नरेंद्र ठाकरे यांनी महाविद्यालयाची प्रगती आणि दर्जा दिवसेंनदिवस वाढत असून ते राष्ट्रीय स्थरापर्यंत पोहचले असे मत व्यक्त केले व त्यांनी प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश घरडे, सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृंदांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाल आणि निरंतर प्रगती साठी हार्दिक शुभेच्छा प्रदान केले.
शैक्षणिक क्षेत्रात अचूक मूल्य रुजविण्यासाठी सर्वंकष संचालक मंडळ व प्राध्यापकवृंद सह कर्मचाऱ्यांचा अतूट सहभागाची नांदी महाविद्यालयास उत्तुंग झेप घेण्यास पुरेसे ठरत आहे.महाविद्यालयासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागाने आम्ही पुन्हा यशाची फिनिक्स झेप घेत मारेगावसाठी गौरवाची श्रुंखला कायम ठेवू.
डॉ.अविनाश नामदेव घरडे
प्राचार्य
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , मारेगाव