‘तो’ बनला निर्भया कार… घरात ओढून अत्याचार..!

◆ मारेगावातील घटनेने संतापाची लाट
◆ कुकर्म करीत आरोपीचा पोबारा , वणीतून केली अटक

विटा न्यूज नेटवर्क – मारेगाव

ती त्याच्या घरासमोरून जाते. हळुवार तो तिला आवाज देतो.ती नकार देते.अट्टाहास सुरू असतांना तिला घरात ओढतो.आणि त्याच्या अंगात नराधम संचारतोय.अन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून बाहेर वाच्यता करण्यास तंबी देतो.बिथरलेल्या अवस्थेत आईला आपबिती कथन करते.भयावह घटनेने कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकते.आणि पोलीस स्टेशन गाठते.
मारेगाव स्थित ही घटना चित्रपटातील नव्हे तर बुधवारला वास्तवात घडलेल्या घटनेने शहरात संतापाची लाट उसळत आहे.
शहरातील एका प्रभागातील भाड्याने असलेल्या युवकाने अल्पवयीन मुलगी त्याच्या दारासमोरून जात असतांना आवाज दिला.घरात येण्याचे संकेत देत असतांना तिने नकार दिला.मात्र गोडी गुलाबी करीत तिला घरात घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.भेदरलेल्या अवस्थेत ती बाहेर निघते पण जातांना तो तंबी देतो.
मात्र , आई तिची शोधाशोध घेत असतांना ती आगळ्या वेगळ्या अवस्थेत दिसते.भावनिक चौकशी अंती झालेली आपबीती कथन करून धक्काच बसते आणि आई तिला घेऊन पोलीस स्टेशन गाठते.ही कुणकुण लागताच आरोपी लखन रावत मारेगाव येथून पोबारा करतो.
तक्रार दाखल होताच पोलीस सतर्कतेने शोध घेत आरोपीस थेट वणी येथून अटक करतो आणि बेड्या ठोकतो. अल्पवयीन असलेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमा विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. तूर्तास आरोपी मारेगाव पोलीस स्टेशन गजाआड आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment