वर्षपूर्ती सोहळा: मैत्री कट्याचा वर्धापन दिवस साजरा

मैत्रीचे सैल झालेले बंध पुन्हा झाले घट्ट
मारेगाव : प्रतिनिधी
मैत्री कट्याच्या स्नेहसंमेलन सोहळ्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्याने एका निसर्ग रम्य ठिकाणी सर्व मित्र एकत्र येवून केक कापून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.
मैत्री कट्टा २०२१ चा अभूतपूर्व स्नेहसंमेलन सोहळा  २५ , २६ सप्टेंबरला २०२१ ला शहरात साजरा करण्यात आला होता. कार्यक्रमात नागपूर, पुणे, गडचिरोली, हैदराबाद, वर्धा, चंद्रपूर अशा  डझनभर शहरात वास्तव्यास असलेले अनेक मित्रांनी आपल्या आठवणी ताज्या केल्या होत्या.
आपण भेटूया असे वचनही एकदुसाऱ्याला दिले होते .म्हणूनच  मैत्री कट्याच्या वर्धापन दिनानिमित्त शहराच्या काही अंतरावर असलेल्या मांगरूळ निसर्गरम्य ठिकाणी वर्धापन दिवस केक कापून साजरा करण्यात आला.
दरम्यान विवेक पांडे यांनी आपल्या गोड आवाजात सदाबहार गीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.आणि मैत्रींचे सैल झालेले बंध  पुन्हा घट्ट झाले.
यावेळी पप्पू जूनेजा, बिना दूपारे (हेपट) प्रतिभा डाखरे, उदय रायपुरे, खालिद पटेल, थारांगणा पटेल, गजानन जयस्वाल, विवेक पांडे, मयुरी जयस्वाल, प्रा.सूर्यकार, साबुद्दिन अजानी, दुष्यंत जयस्वाल, माला बोढे, साधना आस्वले, बदृद्दिन काजी, सुधाकर आसुटकर, साधना आसुटकर सह अनेक मित्र मंडळी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment