नवनिर्वाचित संचालक सत्कार सोहळा
कुंभा : प्रतिनिधी
शेतकरी संस्था शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी संस्था असायला हवी. संस्थेने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत केल्यास नक्कीच शेतकरी आत्महत्येला आळा बसेल असे प्रतिपादन माजी.आ. वामनराव कासावर ह्यांनी कुंभा येथे वसंत जिनिंग अँड प्रेसिंग नवनिर्वाचित संचालकाच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बाजार समिती सभापती तथा ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार वामनराव कासावार होते. तर प्रमुख अतिथी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार, नगरसेवक शंकर मडावी, देवाजी गोहने, सोसायटी अध्यक्ष मारोती मत्ते, आशिष कुळसंगे, ओम ठाकूर, डॅनी संड्रावॉर, वसंतराव आसुटकर, अशोक पांडे, जयसिंग गोहकार, संजय खाडे, केशव आवारी, गजानन खापणे, साधना ठाकरे,जयकुमार आबाड, माजी सरपंच विजय घोटेकर, जयवंत ठेपाले, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, बाबाराव ठाकरे, रवींद्र धानोरकर ,घनश्याम पावडे, प्रा. शंकर वऱ्हाटे, प्रमोद वासेकर, अशोक नागभिडकर सह यावेळी आदी मंचावर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले सरकारने जीवनावश्यक वस्तूवर कर लावून गोरगरिबांची थट्टा केली. देशापेक्षा मताच्या राजकारणावर डोळा ठेवला जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्याचा आकडा फुगत चाललेला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करून शेतकऱ्यांना येतोचित्त मदत करावी.
यावेळी वसंत जिनिंग अँड प्रिसिंग च्या 15 ही संचालकाचा शाल व श्रीफळ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवाजी गोहणे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र मांदाडे यांनी केले , तर आभार प्रदर्शन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेती करिता महेंद्र बोथरा, रतनचंद सुराणा, विजय गड्डमवार, विजय बोथले, गजानन अवताडे, वरून ठाकरे ,राजू महाजन ,सुमंत पाटील ठाकरे, पिंटू डाखरे ,कवडू अंडरस्कर, गजानन आदेवार, संतोष दरवे, दिलीप आत्राम, श्रीकांत गौरकार ,अनिल राऊत, श्रीकृष्ण सोनुले, बंडू चौधरी ,कवडू वाघाडे, भास्कर मुघाटे , अभिजीत पाटिल ठाकरे सह गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.