मारेगाव :प्रतिनिधी
युवक काँग्रेस मारेगाव च्या शहर अध्यक्ष पदी सय्यद समीर यांची माजी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
यावेळेस मारेगाव काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे, मारेगाव कृ. ऊ. बा. समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, डॅनी संड्रावार, विनोद आत्राम तथा काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.