खळबळजनक… दुचाकीला लाथ मारून तीन लाखाची रोकड लांबविली

– मार्डी बामर्डा रोडवर थरार

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील मार्डी ते बांबर्डा दरम्यान असलेल्या फिस्की जंगल परिसरात सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास मागावून येणाऱ्या तीन अज्ञात इसमांनी थेट समोरील दुचाकीला लाथ मारून पाडले अशातच दुचाकीच्या पेट्रोल टॅंकवर असलेली पिशवी व त्यात असलेली तीन लाख रुपयाची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

 

फिर्यादी चेतन विजय चिंचोलकर (वय २५, रा. चोपन, ता. मारेगाव) हे वणी येथून जमीन खरेदीसाठी ३ लाख रुपये उसने घेऊन मोटारसायकलने नांदेपेरा मार्गे मार्डीकडे येत होते. दरम्यान, मछिंद्रा–बांबर्डा मार्गावरील हनुमान मंदिराजवळील जंगल परिसरात मागून आलेल्या रेसर बाईकवरील तिघा अज्ञात इसमांनी पाठलाग करीत फिर्यादीची लाथ मारून बाईक पाडली. काही कळण्यापूर्वीच तिघांनी पिशवी लांबवून मार्डी दिशेने पोबारा केला.चिंचोलकर या घटनेने पुरते गोंधळून पोलिसात धाव घेतली.

 

फिर्यादीने सदर रक्कम शेती व्यवहाराकरिता आणली असल्याचे कळते. दरम्यान, तिघे बाईकस्वार पाळतीवर असल्याचा कयास व्यक्त होत आहे.

 

परिणामी,या प्रकरणी मारेगाव पोलीसात (BNS) कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरट्यानां शोधण्याचे तगडे आव्हान पोलिसासमोर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment