
-फिस्की जंगलातील रस्ता
– विशाल किन्हेकर यांचे नेतृत्व : लेखी आश्वासानंतर आंदोलन मागे
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील मार्डी वरून मच्छिद्रा मार्गे जाणारा रस्ता अरुंद असतांना अपघाताची मालिका सुरु झाली. मानवी दुखापत करणाऱ्या या रस्त्याची दोन्ही बाजूने रुंदीकरण करण्यासाठी आज शिवसेना शिंदे गटाने एल्गार पुकारत शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सदर रस्ता अरुंद असतांना अपघाताच्या मालिकेसह येजा करणाऱ्या वाहतुकीला प्रचंड अडसर निर्माण होत अनेकजण आजतागायत गंभीर दुखापतीने जखमी झाले. मानवी संवेदनशीलता हरविलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मारेगाव तालुका शिवसेना शिंदे गटाकडून आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाने दुतर्फा वाहतूकीच्या रांगा लागल्या होत्या. व्यवस्थेच्या अनाकलनीय धोरणाचा निषेध आणि घोषणा करून परिसर दणाणला.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनाची प्रशासनकरवी गंभीर दखल घेत फिस्की जंगल रस्ता दोन्ही बाजूच्या पट्ट्याचे काम करून मुरूम भरण्यात येईल सोबत पॅचेस व सिलिंग चे काम सुरु करण्यात येईल. मुरूम टाकण्याच्या कामाला तातडीने उद्यापासून सुरुवात करण्यात येणार असल्याच्या उपविभागीय अभियंता, सा. बां. विभाग यांच्या लेखी आश्वासनाने आंदोलनाला फुलस्टॉप देण्यात आला.