Breaking News

भीषण अपघात… बसला नेली ट्रकने चिरत : दोन प्रवासी ठार, 15 जखमी

 

– जळका फाट्या नजीकची घटना

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

चंद्रपूर वरून यवतमाळ कडे जाणारी बस व विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडकेत दोन प्रवासी ठार झाल्याची माहिती आहे.हा अपघात जळका फाट्यानजीक गुरुवारी रात्री 8.15 च्या दरम्यान घडली.

 

चंद्रपूर वरून यवतमाळ कडे जाणाऱ्या बस क्रमांक M H 40 y 5782 व समोरून येणाऱ्या ट्रक ची जबर धडकेत अक्षरशः अर्धी बस चिरत नेली.यात बस मधील दोन प्रवासी ठार झाल्याची माहिती असून 15 प्रवाशी सह ट्रक व बस चालक गंभीररित्या जखमी आहे.

 

भीषण अपघातात मृतक व जखमीचा अधिकृत नावे मिळू शकली नाही. परिणामी, आमदार संजय देरकर जळका येथे कार्यक्रमात असतांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने दाखल होत मृत व जखमी प्रवाश्यांना रुग्णालयात दाखल करण्यास जलदगतीने उपाययोजनेचा अंमल केला.दरम्यान,बहुतांश जखमी प्रवाश्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment