Breaking News

भारूडातून लोकजीवनाचे भावविश्व प्रतिबिंबित होते

 

– भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचे मार्मिक भाष्य 

– मारेगावात लोटपोट हसविणारे भारूड

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

भारूड लोककलेत शरीर जरी मनोरंजनात्मक असले तरी आत्मा प्रबोधनाचा आहे.अनंत काळापासून नांदत असलेली कृषी संस्कृती, त्यातून व्यक्त होणारी ग्रामीण जीवनातील प्रतिमा, लोकाचार, लोकरूढी याला रंजकतेने नटवित लोकसंस्कृती उभी राहते. म्हणून लोकसंस्कृतीचा सहज सुंदर अविष्कार घडविणारी भारूड लोककला ही अनेक परिवर्तनातून जनलोकात स्थान टिकवून असून भारुडातून लोकजीवनाचे भावविश्व प्रतिबिंबित होते.असे जीवनाचे मूल्य सांगणारे मार्मिक भाष्य भारूड कार्यक्रमातून सम्राट ह.भ.प.गोविंद महाराज गायकवाड यांनी केले.

मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पा. ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित अनोख्या भारूड प्रबोधन कार्यक्रमातून सामाजिक जनजागृती सादरीकरणात भाष्य करीत समाजातील अनिष्ठ रूढी, परंपराबाबत केलेले विडंबण भारुडाच्या माध्यमातून मांडणी केली.

 

पाच रंगाच्या रंगीबेरंगी साड्या परिधान करीत श्रुगांर करणाऱ्या सामाजिक प्रश्नावर गवळण सादर करीत वैदिनीच्या वेशातील “बुरगुंडा” चे सादरीकरण, व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या वैफल्यग्रस्थानच्या जीवनावर प्रकाश टाकतांना जगण्याची क्षमता कशी लोप पावते यासोबत अनिष्ठ रूढीत अंगात येणारी माता आणि त्यामागे असलेल्या भक्तांचं वास्तव भारूडच्या माध्यमातून रेखाटून सकारात्मक विषयाला स्पर्श करीत नाजूक विषय हळुवार समाजासमोर मांडले व समाजातील वास्तव विषय घेत भारूडातून उकल केली.

 

भारूडातून शेतकऱ्यांची दाहकता मांडत गोविंद महाराज यांनी शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, कृषी प्रधान पोशिंद्याचे मनोबल उंचाविण्याची गरज असतांना शेतकऱ्यांनी धैर्याने प्रसंगाला तोंड देण्याचे भारुडातून प्रबोधन करतांना “बुरगुंडा” भारूड प्रेक्षकांना चांगलंच भावलं.

आपल्या कलेने प्रेक्षकात हास्याचे कारंजे उडवत असतांना मला पाहायला आलेल्या नरेंद्र मोदी, शरद पवार,दादा कोंडके, राजकुमार व नाना पाटेकर यांचे हुबेहूब आवाज काढत बघणाऱ्यांना लोटपोट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोती गौरकार यांनी केले. कार्यक्रमासाठी गौरीशंकर खुराणा, अंकुश माफूर, आकाश बदकी,रॉयल सय्यद, गौरव आसेकर आदींनी पुढाकार घेतला.

 

वाढदिवस व भारूड कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन व तनमनधन अर्पण करून तालुक्यात सामाजिक, सांस्कृतीक चळवळीचा वसा जपणारे जनहित कल्याण संघटनेचे सुप्रिमो श्री. गौरीशंकर खुराणा यांचा भारूड सम्राट गोविंद महाराज यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येवून सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment