Breaking News

कामगार आंदोलन सातव्या दिवशीही बेदखल

 

 – मुकुटबन येथील कंपनीच्या मुजोऱ्या 

 – आजी माजी आमदार कडून आशेचे किरण

झरी : युवराज निखाडे

तालुक्यातील मुकुटबन येथे कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमधिल काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांना घेऊन जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) द्वारा सुरू आंदोलनाला आज 7 दिवस लोटूनही कंपनी व प्रशासन लक्ष देण्यास टाळाटाळ करत आहे.

 

या आंदोलनाला आजी व माजी आमदारांनी भेट दिली व मागण्या पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.मात्र, कंपनीच्या मुजोर धोरणाने सर्वच हवालदिल होत असतांना आंदोलकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

आठवड्यापासून मुकुटबन येथील RCCPL MP BIRLA कंपनीतील कामगारांचे कामबंद आदोलन सुरु आहे. कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यात यावे, कामाचे तास कामगार संहीतेप्रमाणे ठेवावे, वातावरण सुविधाजनक ठेवावे, सुरक्षा साधने पुरविण्यात यावे, कायद्या प्रमाणे वेतनवाढ करण्यात यावे, कामगारांना PF नियमित जमा करण्यात यावे अशा विविध मागण्या आहेत. या संपूर्ण मागण्या योग्य असल्याचे सांगितले जात असतांना. याबाबत माजी आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कामगारांचे मागण्या पूर्ण करण्या करिता चांगलेच धारेवर धरले.मात्र, कंपनी झोपेचे सोंग घेवून असल्याने तोडगा निघण्याची शक्यता धूसर होत आहे.

 

आंदोलनस्थळी आमदार संजय देरकर व पदाधिकारी आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट दिली. तूर्तास कंपनीकडून ठोस पावले उचलल्या गेले नसल्याने तब्बल सात दिवसा नंतरही कामगारांचे आंदोलन बेदखल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment