Breaking News

बिर्ला सिमेंट कंपनीत कामगारांचे कामबंद आंदोलन शिगेला

 

– मुकुटबन : कामगार व्यवस्थापकात तिढा कायम

झरी जामणी: युवराज निखाडे 

मुकूटबन येथील आरसीपीएल एम. पी. बिर्ला सिमेंट कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांनी आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे.

वणी विधानसभा आयटकचे कॉ.अनिल हेपट व कॉ.अनिल घाटे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील तणाव तीव्र झाला आहे.

आपल्या मूलभूत मागण्यासाठी उभारलेल्या आंदोलनाला काही सरपंचांनी व राजकीय पक्षांकडून पाठींबा जाहिर केला आहे.

कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये साप्ताहिक सुट्टी, विभागवार किंवा कंपनीनुसार निश्चित करून त्या सूचना फलकावर ठळकपणे प्रकाशित करणे, कामगारांना वेतन, सामाजिक सुरक्षा किंवा कोणत्याही कारखान्याबद्दल तक्रार करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे नाव व पत्ता सूचना फलकावर प्रसिद्ध करणे, तसेच वार्षिक १२ दिवसांची कॅज्युअल लीव्ह (CL) पगारी सुट्टी आणि राष्ट्रीय / घोषित सुट्ट्या (१६) लागू करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, २० दिवसांच्या उपस्थितीवर वार्षिक बोनस मिळावा, अशीही त्यांची मागणी करण्यात आली आहे.

 

कामगार न्यायालयाचे यवतमाळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, मुकूटबनचे ठाणेदार आणि तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.या आंदोलनात शेकडो कामगार उपस्थित होते.

आज तिन दिवस उलटूनही कंपनीने आंदोलनाकडे बगल दिली त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे.आंदोलनात तोडगा न निघाल्यास तणावाकडे हे आंदोलन झूकेल अशीही शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment