Breaking News

पावणे चार लाख रु. बक्षीसांची खैरात… मुकुटबन मध्ये रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

डोंबिवलीचे ओंकार शेटे सामन्याचे समालोचक
– आशिष खुलसंगे (राजे) चषक स्पर्धा

झरी जामणी : युवराज निखाडे
न्यू एलेवन क्रिकेट क्लब मुकुटबन च्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत तब्बल पावणे चार लाख रुपयांच्या बक्षीसांची खैरात असून येत्या 10 नोव्हेंबर पासुन ही स्पर्धा सुरु होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही मुकुटबन येथे “MPL” क्रिकेट स्पर्धा “राजे चषक” आयोजित करण्यात आले आहे .या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार असुन बक्षीसांची लयलूट आहे.यात प्रथम परितोषिक १५०००० आहे, द्वितीय पारितोषिक १०००००, तृतीय आणि चतुर्थ अनुक्रमे ७५००० आणि ५०००० ठेवण्यात आले आहे.या मध्ये १० संघ मालक आहे आणि तालुक्यातील खेळाडू सहभागी होणार आहे.

विशेष म्हणजे आयोजन समितीने या सामन्यांचे थेट प्रक्षेपण यूट्यूब लाईव्ह वर ठेवले आहे. स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे “डोंबिवलीचा आवाज ओंकार शेटे” हे संपूर्ण सामन्याचे समलोचन करणार आहे.

ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलेला
वाव मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. आयोजकांनी सर्व जनतेला ह्या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment