– सभापती पदाचे आरक्षण जाहीर
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
राजकीय क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले असून मारेगाव पंचायत समितीला सभापती म्हणून नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष ) ची वर्णी लागणार आहे.
मारेगाव तालुक्यात चार गण असून पंचायत समिती यात नेमके कसे गणनिहाय आरक्षण निघतात याकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नजरा खिळल्या आहे.
दरम्यान , डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली नसली तरी संभाव्य उमेदवार व गणाचे निघणारे आरक्षण यावर चिंतनाला सुरवात केली आहे.
राजकीय पक्षातील अनेक दिग्गजांनी या पदासाठी बार्शीग बांधले असून गण आरक्षण नेमके कसे निघतात याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सोमवार ला होणाऱ्या सोडतीत मारेगाव पंचायत समितीच्या मुख्य दावेदारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.