– फिर्यादीच्या घरासमोरच शिवीगाळ
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
येथील प्रभाग क्रमांक 17 मध्ये वास्तव्यात असलेल्या शिक्षकाच्या घरासमोर वणी येथील दोन युवकांनी धुमाकूळ घालीत जातीयवाचक शिवीगाळ केली. एवढेच नव्हेतर मोबाईल वरून अश्लील भाषेच्या लाखोळ्या वाहिल्याने अपमानित झालेल्या फिर्यादीने मारेगाव पोलिसात धाव घेत तक्रार नोंदविली त्यानुसार वणी येथील दोन युवकांवर गुरुवार ला अनु. जाती / जमाती कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
येथील प्रभाग 17 मध्ये पेशाने शिक्षक असलेले कुटुंबासमवेत वास्तव्यात आहे. दि. 3 आँक्टोबर रोजी संध्याकाळी वणी येथील नामे श्रेयस चिट्टलवार (23) व आदित्य दास (23) हे घरासमोर येत धमकीवजा अश्लील भाषेत शिवीगाळ करीत निघून गेले.
फिर्यादीच्या वडिलांनी बाहेर असलेल्या मुलाला बोलावून घेतले. त्या युवकांचा शोध घेतला मात्र, ते वणीकडे निघून गेल्याची माहिती मिळाली. दरम्यान, कोलगाव रोडवरील मित्राकरवी दास याला फोन केला असता उलटपक्षी जातीयवादक आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
परिणामी, मारेगाव येथील फिर्यादी युवकाने पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानुसार श्रेयस चिट्टलवार व आदित्य दास दोघेही रा. वणी यांचेवर अनु. जाती जमाती प्रतिबंधक कायदा सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.