Breaking News

पर्वणी… मारेगावात आजपासून गरबा नृत्याचे मोफत प्रशिक्षण

 

– आयोजकाकडून आकर्षक व प्रोत्साहन बक्षीसांची खैरात 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

नवरात्रोत्सवाला अवघे दिवस शिल्लक असतांना पारंपारिक वैशभूषेत गाण्यावरील दांडिया गरबा करीत थिरकायला सर्व वयोगटातील प्रशिक्षणार्थी सज्ज झाले असून आजपासून मारेगाव गरबा उत्सव 2025 चे वतीने मोफत गरबा प्रशिक्षण बदकी भवन येथे होत आहे. सहभागी नवनविन स्पर्धकांना आकर्षक बक्षीसासह प्रोत्साहन बक्षिसे देण्यात येणार आहे.

गरब्यातील विविध पारंपारिक प्रकार असलेल्या दोडिया, तीन ताली आजच्या तरुणाईसाठी सालसा गरबा, सुरती स्टाईल, वेस्टर्न गरबा, फायर व बॉलिवूड गरबाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तूर्तास प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या तयारीला प्रारंभ होत असून गरब्याचे विविध प्रकार शिकण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे.

 

विविध स्पर्धा दांडिया गरब्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन आज रविवार सायं.4 वाजेपासून प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे.मोफत असलेल्या गरबा प्रशिक्षणात विविधांगी बक्षीसांची खैरात होणार आहे.सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करिता आयोजन समितीचे ईशांत दारुंडे, चेतन खामणकर, ओम भोयर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment