– कोलगावच्या शेतकऱ्याने मारेगावच्या हायवे लगत घेतले विष
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
कोलगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने वणीकडे जाणाऱ्या हायवे लगत एका शेतात विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज शनिवारला सकाळी 6 वाजता उघडकीस आली. प्रमोद रुदाजी धोंगडे (46)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील येथील प्रमोद यांचेकडे केवळ दोन एकर शेती असून तो इतरही मोलमजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकत होते.
काल शुक्रवारला एका शेतकऱ्याकडे शेत पिकांची फवारणी करण्यास गेले होते. फवारणी करण्यास आल्यागत मारेगाव कडून मांगरूळ कडे जाणाऱ्या हायवे रस्त्यालगत एका शेतात गेला आणि तिथे विष ग्रहण करून ईहलोकाची यात्रा केली. सकाळी शेतकरी शिवारात जातांना ही दुर्देवी घटना उघडकीस आली.
तूर्तास आत्महत्येचे कारण अस्पष्ठ असून मृत शेतकऱ्याच्या मागे आई, पत्नी व तीन मुली आहे.