– जळका फाट्यानजीकची घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दुचाकी व कारच्या अपघातात महिला जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी एक वाजताचे सुमारास घडली.
सविता बंडू सिडाम (49) असे मृत महिलेचे नाव असून पती बंडू बन्सी सिडाम (53) रा. वांजरी ता. वणी हे गंभीर जखमी आहे.
सिडाम दाम्पत्य हे करंजी येथून दुचाकी ने वणी कडे जात होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार क्रं.MH 34 CR 7548 च्या कार चालकाचे नियंत्रण सुटून कारने दुचाकीला धडक दिली या अपघातात महिला जागीच ठार झाली तर दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाले. जखमी बंडू सिडाम यांना करंजी येथे हलविले तर सविता ह्यांचा मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.