
– मारेगावात शासनाच्या परिपत्रकाची ऐशीतैशी
– युवकांना किडनी, जलपंडू , कावीळने ग्रासले
मारेगाव : दीपक डोहणे
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना पद्धतशीर बगल देवून मारेगावात भल्या पहाटे पासून इंग्रजी दारूचा महापूर मागच्या दारातून वाहत आहे. यात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला असून युवा वर्गाची या व्यसनाने झोप उडाल्याने पहाटे पहाटे त्यांना जाग येत असल्याचे विदारक वास्तव संबंधित विभागाने आणून ठेवले आहे.
प्रत्येक विभागाची एक कार्यप्रणाली असते. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाचे परिपत्रक ग्राह्य धरल्या जाते. या परिपत्रकाची खरी अंमलबजावणी संबंधित विभागाचा “अधिकारी” हा खरा कर्णधार असतो मात्र हा कर्णधारच मॅनेज होत असेल तर सर्वच ठिकाणी आलबेल चालतात . असाच काहीसा प्रकार मारेगावात उजेडात आला आहे.
मारेगावात डझनभर पेक्षा जास्त असलेल्या इंग्रजी दारू दुकान उघडण्याची खरी वेळ सकाळी दहाची आहे. मात्र अधिकची ‘लक्ष्मी’ पदरी पाडण्यासाठी मारेगावचे बिअर बार भल्या पहाटे पासून मागचे दरवाजे सताड उघडे करून दारू विकत आहे सोबत वेगवेगळ्या चकणाची मेजवानी ग्राहकाचे चोचले पूरवून अधिकाधिक ग्राहक आपल्या व्यवसायाच्या पहिल्या टप्प्यात आर्थिक भर कशी घालेल याची विशेष काळजी घेतल्या जात आहे.
भल्या पहाटे पासून सुरु करणाऱ्या बिअर बार मध्ये मागच्या दरवाजातून युवा वर्गाची फौज अनेक आजाराने ग्रासले आहे. कावीळ, जलपंडू, किडनी सारखे गंभीर आजाराचे दारू दुकानदार पैशाच्या लोभात युवा वर्गाचे पाप घेत आहे.
दरम्यान,नियमाचे उल्लंघन करून भल्या पहाटे पासून मागच्या दरवाजाचे दारू दुकान सुरु करण्यास ‘लक्ष्मी दर्शनाने’ कुणाची रीतसर परवानगी आहे ? हा खरा प्रश्न असला तरी यात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्याचे हात ओले झाल्याच्या साशंकतेला वाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबतची सजग नागरिकांनी ही युवकांना मृत्यूच्या खाईत लोटणारी तक्रार अमरावती, यवतमाळ सह थेट मुंबई ला पाठविण्यात आली आहे.