– दैव बलवत्तर : दुचाकीवरील चुलतभाऊ बचावला
– निंबाळा नजीकची घटना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
वणीवरून खासगी कामे आटोपून मारेगावाकडे दुचाकीने परतत असतांना दुचाकीवरील नियंत्रण सुटून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परमध्ये गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर मृतकाचा चुलतभाऊ सुखरूप असल्याची माहिती आहे.ही घटना आज गुरुवारला संध्याकाळी 6 वाजता निंबाळा फाट्यानजीक राज्यमहामार्गांवर घडली.प्रविण तुळशीराम येरमे (45) रा. पांढरकवडा (पिसगाव)ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे.
प्रविण व रवी हे दोघेही सख्खे चुलत भाऊ खासगी कामाकरिता वणी येथे दुपारी गेले होते. सायंकाळी परत येत असतांना निंबाळा नजीक त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या टिप्पर वाहना खाली आल्याने या अपघातात पिसगांव येथील ग्रा. पं. सदस्य प्रविण येरमे यांचा जागीच करून अंत झाला तर दुचाकी मागे बसलेला रवी येरमे हा सुदैवाने बचावला. मृतकाच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी व दोन मुली आणि दोन विवाहित बहिणी आहे.या दुर्देवी घटनेने पिसगाव पहापळ येथे शोककळा पसरली असून मृतक हा स्वस्त धान्य दुकान चालवायचे. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पिसगाव येथील माजी उपसरपंच तुळशीराम येरमे यांचे ते एकुलतेएक चिरंजीव होते.