Breaking News

खळबळजनक.. नवरगावच्या महिला सरपंच लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात

कंत्राटदाराकडून 80 हजार रु. मागणी भोवली : तालुक्यात खळबळ

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील नवरगाव (धरण ) येथील महिला सरपंच हिने संरक्षण भिंतीच्या देयके धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी तब्बल 80 हजार रु. ची मागणी केल्याने फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून अँटी करप्शन ब्युरो पथकाने ताब्यात घेतले. सुचिता फुलू कुमरे असे आरोपी सरपंच महिलेचे नाव आहे.

तालुक्यातील नवरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे संरक्षण भिंत बांधकाम एका कंत्राटदाराने काम केले. कामाचे बिल काढण्यासाठी धनादेश (चेक ) वर स्वाक्षरी करण्यासाठी येथील लोकसेवक सरपंच कुमरे ह्यांनी कंत्राटदार यास तब्बल 80, 000 रु. ची मागणी केली.

परिणामी, कंत्राटदार यांनी थेट यवतमाळ लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार केली व सापळा रचण्यात आला. मात्र, सरपंच महिलेस साशंकता निर्माण झाल्याने रक्कम घेण्यास टाळाटाळ करीत होत्या. दरम्यान,पुरेशी माहिती आणि बळकट पुराव्याने सरपंच कुमरे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल करुन अटक केली. या घटनेने तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment